मुंबई

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

CD

कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या
पनवेल, ता. ३ : नवीन पनवेल सेक्टर सातमधील कोस्मो को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे उघडकीस आले आहे. सौरभ राजू मिश्रा असे या तरुणाचे नाव असून, त्याने राहत्या घरात ‘सेल्फोस’ नावाची विषारी पावडर घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ हा एका खासगी कंपनीत कामाला होता. २०२२ मध्ये त्याचा विवाह झाला होता; मात्र लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. हा वाद इतका विकोपाला गेला, की प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. तेव्हापासून सौरभ प्रचंड मानसिक तणावाखाली होता. सोमवारी (ता. २) त्याचे आई-वडील गावी गेलेले असताना, सौरभने विष प्राशन केले. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सौरभचे आई-वडील गावाहून परतले असता त्यांना सौरभ बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या आत्महत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT