मुंबई

लाल-पिवळ्या फुलांचे गाव

CD

लाल-पिवळ्या फुलांचे गाव
झाडखैरे गावात दहा हजार झेंडूंची लागवड
वाडा, ता.४(बातमीदार)ः तालुक्यातील झाडखैरे गावात ठिबक सिंचन पद्धतीने झेंडू फुलाच्या शेतीतून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे भाताचे कोठार असलेल्या वाडा तालुक्याची ओळख आता फुलांचे गाव अशी झाली आहे.
वाडा तालुक्याला पाच नद्यांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. या पाण्याचा उपयोग करून शेतकरी कडधान्य, फळपिकेस फुलशेतीसारखी नगदी पिके घेऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर झाडखैरे गावातील आमले कुटुंबाने दोन एकर जागेत दहा हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. आधुनिक ठिबकसिंचन पद्धतीचा वापर करून पिवळा अंबर, कलकत्ता झेंडूच्या विविध जातींची लागवड केली आहे. यासाठी साधारण ७० ते ८० हजार रुपये खर्च अपेक्षित असून धार्मिक कार्यांमध्ये झेंडूच्या अनन्य साधारण महत्त्व असल्याने बाजारपेठेतही चांगला दर मिळत आहे.
---------------------------
४० ते ५० रूपयांचा भाव
ठिबक सिंचनामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. मजुरीचा खर्च कमी होतो. झेंडूचे फूल तयार झाल्यापासून चार दिवसांनंतर तोडण्यास सुरुवात होते. १२ ते १५ वेळा फूले तोडली जातात. कल्याण बाजारपेठेत फुलांना प्रतिकिलो ४० ते ५० रूपये असा भाव मिळतो.
------------------------
दोन एकर जागेत दहा हजार झेंडू रोपांची लागवड केली आहे. ठिबक सिंचन पद्धतीमुळे खर्च, मेहनत दोन्ही कमी झाली आहे. बाजारात चांगला भाव मिळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत आहे.
- नरेश आमले, शेतकरी, झाडखैरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT