मुंबई

पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत

CD

पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत
बोईसरमधील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा
बोईसर, ता.४ (वार्ताहर) : बोईसर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे एकीकडे शहराचे झपाट्याने शहरीकरण होत असताना दुसरीकडे पायाभूत सुविधांमध्ये शहर मागे पडल्याचे चित्र आहे.
बोईसर रेल्वे स्टेशन ते चित्रालय, बोईसर रेल्वे स्टेशन ते नवापूर रोड अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गांवर बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेला थेट दुकाने उभारली आहेत. परिणामी, पादचाऱ्यांना थेट मुख्य रस्त्यांवरून चालावे लागते. लहान मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिकांना चालणे धोकादायक ठरत आहे. रस्त्यावरून चालताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्नॅचिंग तसेच इतर अनुचित घटना घडत असल्याने सुरक्षित पादचारी मार्ग नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अतिक्रमण तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित मार्ग तयार करावा तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------------------
महसूल विभागाकडून पाहणी
- बोईसर ग्रामपंचायत हद्दीत ५०० हून अधिक घरे अतिक्रमित असल्याचे एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. याच अनुषंगाने बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील यादव नगर, धनानी नगर तसेच इतर काही भागांमध्ये २ फेब्रुवारी रोजी मोजणी करण्यात आली.
- महसूल मंडळ अधिकारी विजय गुडकर, तलाठी जनाठे, तलाठी गावित तसेच कोतवाल बिपीन पाटील उपस्थित होते. यापूर्वीही अनेक वेळा अतिक्रमणाची मोजणी, पाहणी होऊन अहवाल तयार करण्यात आले, पण प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT