मुंबई

नजरेला नवी दिशा देणारी सेवा; देवाभाऊ चष्म्याचा प्रकाशप्रवास!

CD

देवाभाऊ चष्म्याचा प्रकाशप्रवास
नांदेडच्या शहिदी समागमात बदलापुरातून माणुसकीचा प्रकाशोत्सव
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) ः ‘हिंद–दि–चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अभूतपूर्व संगम अनुभवायला मिळाला. या सोहळ्यात बदलापूर येथील दृष्टीमित्र सामाजिक कार्यकर्ते साकिब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाने हजारो भाविकांना नवी दृष्टी दिली. डोळ्यांच्या तपासणीसाठी लागलेल्या रांगा केवळ गरजेचे दर्शन घडवत नव्हत्या, तर या सेवेवरील विश्वासही अधोरेखित करत होत्या.
नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी गुरुतेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात देवा भाऊ चष्मा उपक्रम आकर्षणाचा विषय ठरला. बदलापूरतील दृष्टीमित्र साकिब गोरे यांनी या उपक्रमासाठी विशेष व्यवस्था उभारली होती. या स्टॉलवर केवळ नेत्रतपासणीच नव्हे, तर गरजूंना मोफत चष्मेही देण्यात आले. वृद्ध, महिला, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी अशा विविध स्तरांतील हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच डोळ्यांची तपासणी केल्याचे सांगितले. गर्दीत उभे असलेले हे चेहरे केवळ भाविक नव्हते, तर डोळ्यांतील अंधुकतेवर मात करण्यासाठी आशेने पाहणारे डोळे होते. साकिब गोरे यांनी आपल्या सेवेतून या आजारी नजरांना नवी दृष्टी दिली. नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप त्यासोबतच डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा गरजूंना आर्थिक मदत देखील करण्यात आली. यावेळी नांदेडमधील हजारो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

हमालीपासून मानवतेपर्यंतचा प्रवास
बदलापूरसारख्या छोट्या शहरात हलाखीच्या परिस्थितीत वाढलेले साकिब गोरे यांनी बालपणापासून मिळेल ते काम करून जीवनाशी झुंज दिली. मात्र, आपण पाहत असलेले जग समाजातील कित्येक लोकांना पाहता येत नाही याची सल त्यांच्या मनात कायम होती. याच संवेदनशीलतेतून दृष्टीमित्र म्हणून काम करण्याची प्रेरणा मिळाली. गरीब वस्त्यांमध्ये जाऊन मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया सुरू झाल्या आणि देवाभाऊ चष्मा सेवा आकाराला आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रेरणेतून नाव मिळालेल्या या सेवेची कीर्ती आज युरोपसह आशिया खंडातील अनेक देशांत पोहोचली आहे. आतापर्यंत १७ लाख मोफत चष्मे व ६३ हजार यशस्वी शस्त्रक्रिया करून लाखो गरजूंना नवी दृष्टी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT