बदलापूरमध्ये ‘हॅपी स्ट्रीट’चा जल्लोष
पाच वर्षांपासून सत्तरीपर्यंतच्या नागरिकांचा सहभाग
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) ः कात्रप तलाव परिसरात ‘हॅपी स्ट्रीट’ हा आगळावेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या वतीने रविवारी (ता. १) या उपक्रमाचे आयोजि करण्यात आले होते. या उपक्रमात पाच वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.
संगीत, नृत्य, योग, धावणे, लाठी-काठी, शारीरिक व्यायाम, पथनाट्य अशा विविध शारीरिक व कलात्मक क्रियांच्या माध्यमातून समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रुचिता घोरपडे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रोटरी प्रांतपाल डॉ. निलेश जयवंत व रोटरीचे आजी-माजी पदाधिकारीही कार्यक्रमास उपस्थित होते.
टीव्ही, मोबाईल व डिजिटल माध्यमांमुळे वाढत चाललेल्या निष्क्रिय जीवनशैलीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. निलेश जयवंत यांनी यावेळी केले. शरीर, मन व आत्म्याचा समतोल साधण्यासाठी आणि आरोग्यदायी सवयी रुजवण्यासाठी लोकांचे एकत्र येणे आवश्यक असून रोटरीचा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम या दृष्टीने यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनीही अशा समाजहिताच्या कार्यक्रमांना नेहमीच सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमात पतंजली योग मंडळ, गार्गी अकादमी, सेव्हन सिस्टर्स अकादमी, नृत्यमयी व पदन्यास इन्स्टिट्यूट ऑफ डान्स यांसारख्या संस्थांनी सहभाग घेतला. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला हजारो नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पंधराहून अधिक स्टॉल्सवर खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गोहिल यांनी केले, तर क्लबचे चिटणीस संतोष बने यांनी आभार प्रदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.