मुंबई

प्रगतीनगर पोलिसांच्या रडारवर

CD

प्रगतीनगर पोलिसांच्या रडारवर
१०९ नायजेरियन ताब्यात, अमली पदार्थ विक्रीचा संशय
नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) ः नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. याच पार्श्वभूमीवर बुधवार सकाळी विशेष मोहिमेत तब्बल १०९ नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगीच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे, विजय जाधव, दिलीप घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दीडशेच्या वर पोलिस बंदोबस्तासह कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान संशयितांची ओळखपत्रे, व्हिसा, पासपोर्ट, वास्तव्यासंबंधी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तसेच संशयास्पद हालचालींमुळे व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.
------------------------------------
नालासोपारा परिसरात अमली पदार्थ विक्रीसारख्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा राबवण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थविरोधी कारवाईचे कौतुक होत आहे.
- पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT