मुंबई

डहाणू प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

CD

डहाणू प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी
रोजगार न दिल्यास कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा
कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात सुरू असलेल्या एल अँड टी कंपनीच्या प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना तात्काळ रोजगारात प्राधान्य द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाढवण बंदर ट्रान्सपोर्ट व कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यात सध्या विविध मोठे विकास प्रकल्प सुरू असून, संबंधित प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल व अकुशल कामगार, वाहतूक व्यवस्था तसेच यंत्रसामग्रीसाठी स्थानिकांना डावलून बाहेरील राज्यांतील कंत्राटदार, कामगार आणि वाहनधारकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या हक्कावर गदा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. संघटनेने आपल्या निवेदनात काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. प्रकल्पासाठी लागणारे सर्व कुशल व अकुशल कामगार डहाणू तालुक्यातील स्थानिकांमधूनच प्राधान्याने घेण्यात यावेत. कामगारांना मजुरी, भत्ते व इतर सुविधा कामगार कायद्यांनुसार आणि बाजारभावाप्रमाणे देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन कामासाठी लागणारे कारकून, पर्यवेक्षक व देखरेख कर्मचारी अशा विवध पदांवर स्थानिकांना संधी देण्याची मागणी करण्यात आली. प्रकल्प अभियंता, व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षक यासारख्या पदांवरही पात्र स्थानिक उमेदवारांची नियुक्ती करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणारी चारचाकी वाहने भाडेतत्त्वावर स्थानिक वाहनधारकांकडूनच घेण्यात यावीत, अशीही अट संघटनेने घातली आहे.
प्रकल्पासाठी लागणारी जेसीबी, हायवा, पोकलेन, ट्रॅक्टर, पाणी टँकर तसेच इतर लहान-मोठी वाहने स्थानिक व्यावसायिकांकडून घेण्याची मागणीही संघटनेने केली आहे. स्थानिकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही युनियनतर्फे देण्यात आला असून, प्रशासन आणि कंपनीने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देताना विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, भाजपचे जिल्हाध्यक्ष व युनियनचे अध्यक्ष भरज राजपूत, उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Pargaon News : टाव्हरेवाडीच्या दोन भावांच्या गोठ्यातील संकरीत कालवडींचा राज्यात गवगवा; विविध कृषि प्रदर्शनात ठरत आहे अव्व्ल

Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT