

Vaibhav Suryavanshi | U19 World Cup
Sakal
India Sets Historic 412-Run Target for England: शुक्रवारी (६ फेब्रुवारी) १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना हरारेमध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात खेळला जात आहे.
या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) विश्वविक्रमी शतकी खेळी केली आहे.
आता या सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड कप (U19 World Cup) जिंकायचा असेल, तर इंग्लंडला ४११ धावा करण्यापासून थांबवण्याचे आव्हान भारतासमोर आहे, तर इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल, तर इतिहास घडवावा लागणार आहे. कारण अद्याप इतके मोठ्या लक्ष्याचा पाठलाग या स्पर्धेच्या इतिहासात झालेला नाही.