मुंबई

घाटकोपरमध्ये माता रमाई जयंती भव्य स्वरूपात साजरी होणार

CD

घाटकोपरमध्ये माता रमाई जयंती भव्य स्वरूपात साजरी होणार
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांची १२८वी जयंती यंदा घाटकोपर पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर परिसरात भव्य स्वरूपात साजरी केली जाणार आहे.
या जयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसमावेशक महिलांचा सहभाग. सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या महिला या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. माता रमाई यांचा जन्मदिन शनिवार, ७ फेब्रुवारी रोजीला असून, जयंती सोहळ्याला मंगळवार, ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कालावधीत परिसरातील महिला विविध सामाजिक उपक्रम राबवणार असून, सध्या त्या वस्त्यावस्त्यात फिरून जनजागृती करीत आहेत. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व जाती-धर्मांच्या महिलांचा सहभाग असलेल्या या सोहळ्याला परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही पाठिंबा देत आहेत. मंगळवारी माता रमाबाई आंबेडकर नगर येथे जयंती आयोजनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक महिला कार्यकर्त्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सामाजिक समता व बंधुत्वाचा संदेश देत शनिवार, ७ फेब्रुवारीला माता रमाई यांच्या प्रतिमेची भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीतून सामाजिक व धार्मिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला जाणार आहे. दरम्यान, हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता स्वेच्छेने वर्गणी देत असून, संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात येत आहे. सामाजिक एकता, महिला नेतृत्व आणि लोकसहभाग यामुळे हा जयंती सोहळा विशेष आकर्षण ठरणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 Trailer: रहमान डकैत मेला… आता लियारीचा नवा बादशाह कोण? ‘धुरंधर २’ ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा धडाकेबाज इशारा!

T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

SCROLL FOR NEXT