मुंबई

झाडे लावा, झाडे वाढवा फक्त कागदावरच; जंगलतोड मात्र आजही सुरूच

CD

झाडे लावा, झाडे वाढवा फक्त कागदावरच
जंगलतोड मात्र आजही सुरूच
वज्रेश्वरी ता ४(बातमीदार) : शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून दरवर्षी झाडे लावा, झाडे वाढवा अशा घोषणा दिल्या जातात. वृक्षारोपणाचे फोटो, आकडेवारी आणि अहवाल मात्र कागदावरच झळकत असतात. वास्तवात आजही अनेक ठिकाणी सर्रास जंगलतोड सुरू असल्याचे विदारक चित्र ग्रामीणच्या बहुतांश वनविभाग जागेत पाहायला मिळत आहे.
वज्रेश्वरी, गणेशपुरी, ऊसगाव तसेच आणि भिवंडी येथे विकासकामे, बांधकाम प्रकल्प, दगडखाणी, रस्ते विस्तार आदी कारणांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. यावर संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष किंवा मौन दिसून येत आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणाचे गोडवे गायले जात असताना दुसरीकडे हिरवळ नष्ट होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण घटणे, तापमानात वाढ, भूजल पातळी खालावणे, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होणे असे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.

कृतीशील संदेश प्रत्यक्षात हवा
वृक्षारोपण कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता लावलेली झाडे जगवण्याची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमी वैभव पवार यांनी सांगितले आहे. झाडे लावा ही केवळ घोषणा न राहता झाडे वाचवा हा कृतीशील संदेश प्रत्यक्षात उतरवला नाही, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. काही भागात खैर लाकूड व चोरटी तोड थांबविण्यासाठी रात्रीचे गस्त वाढवणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT