संकल्प २०२६ : जे प्राईम स्वास्तिक टाऊनशिपसाठी चॅनेल पार्टनर्स मेळावा
६०० हून अधिक चॅनेल पार्टनर्सची उपस्थिती, भविष्यातील वाटचालीचा आराखडा सादर
नवी मुंबई, ता. ४ : जे प्राईम बिल्डकॉन यांच्या आगामी ‘जे प्राईम स्वास्तिक’ टाऊनशिप प्रोजेक्टसाठी आयोजित चॅनेल पार्टनर्स मेळावा वाशी येथील आयलीफ ग्रँड बॅंक्वेट येथे उत्साहात पार पडला. नवी मुंबई व मुंबई परिसरातील ६०० पेक्षा अधिक नामवंत चॅनेल पार्टनर्स या वेळी उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाला ग्लॅमर मिळाला, तर कलाकार ओम यादव यांच्या प्रभावी सादरीकरणाने वातावरण रंगले. आंतरराष्ट्रीय बिझनेस कोच दिलीप औटी यांनी घेतलेल्या मोटिव्हेशनल सेशनमध्ये नियोजनबद्ध कामकाज, आव्हानांवर मात व व्यवसायवृद्धीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
जे प्राईम बिल्डकॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश जगदाळे यांनी चॅनेल पार्टनर्सचे स्वागत करीत संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. जे प्राईम कुटुंबाची संख्या ८०० हून अधिक झाल्याचे सांगत आतापर्यंत ८५० कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. २०३०पर्यंत ६,००० कुटुंबांना घरे देण्याचा संकल्प ‘संकल्प २०२६’च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
चौकट
डिजिटल रियल इस्टेटकडे वाटचाल
जे प्राईम बिल्डकॉन लवकरच होम ओनर्स, चॅनेल पार्टनर्स आणि खरेदीदारांसाठी एक अभिनव डिजिटल यंत्रणा सादर करणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार अधिक पारदर्शक, वेगवान व विश्वासार्ह होतील. तसेच मुंबई ३.० पट्ट्यातील सुमारे १७० एकर लँड बँक आणि आगामी तीन ते चार हजार रोजगारनिर्मितीचा आराखडा सादर करीत रियल इस्टेटमधील नाती विश्वासावर उभी असतात, असा विश्वास अविनाश जगदाळे यांनी व्यक्त केला.