हरभऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त
विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड
विक्रमगड, ता.४ (बातमीदार)ः तालुक्यात खरीप हंगामानंतर जमिनीत टिकून असलेला ओलावा, असलेली थंड, कमी खर्चातील पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.
तालुक्यातील कुंर्झे, मलवाडा, आलोंडे, जांभे, आपाटी, तलवाडा व परिसरातील गावांमध्ये हरभऱ्याच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून वातावरण पिकास अनुकूल असल्याचे शेतकरी सांगतात. हरभरा हे पीक कमी पाण्यावर येणारे असून रासायनिक खतांचा मर्यादित वापर लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. यासोबतच कडधान्य पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. यंदा कडधान्य पिकांना बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच रब्बी हंगामात हरभरा लागवड विक्रमगड तालुक्यासाठी दिलासादायक ठरत असून योग्य हवामान व बाजारभाव लाभल्यास समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
----------------------------
रोगाच्या प्रादुर्भावाची भीती
अनेक शेतकरी सुधारित जातींचे बियाणे, बीजप्रक्रिया, योग्य अंतरावर पेरणी तसेच वेळेवर आंतरमशागत करत आहेत. काही भागात ठिबक सिंचनाच्या साहाय्याने हरभरा लागवड करण्यात येत असून त्यामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा आहे. हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पाऊस तसेच करपा, मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.