मुंबई

वाढीव मुदतीत प्रचाराला वेग

CD

वाढीव मुदतीत प्रचाराला वेग
सोशल मीडिया, प्रत्यक्ष भेटींवर भर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : पूर्वनियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात बदल करीत मतदानास दोन दिवसांची मुदतवाढ दिली. सुधारित कार्यक्रमानुसार शनिवारी (ता. ७) मतदान होणार असून, मतमोजणी सोमवारी (ता. ९) पार पडणार आहे. या वाढीव कालावधीचा फायदा घेत सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात अधिक जोमाने उतरले आहेत.

जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. मतदानाचा दिवस पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी आणखी दोन दिवस मिळाले असून, या काळात प्रचाराची तीव्रता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गृहभेटींवर अधिक भर दिला जात आहे. उमेदवार स्वतः गावोगावी, वाड्यावस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधत असून, आपल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतांची मागणी करीत आहेत. अनेक ठिकाणी लढत अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार सुरू ठेवण्यावर भर दिला जात आहे. एकूणच मतदानाच्या तारखेत झालेल्या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

प्रचार रणनीतीत बदल

सोशल मीडियाचाही प्रचारात मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांतून प्रचार संदेश, व्हिडिओ, आवाहने प्रसारित केली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटी, छोट्या सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका यांद्वारे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाढीव मुदतीमुळे प्रचाराची रणनीती बदलल्याचेही दिसून येत आहे.

गुरुवारी रात्री प्रचार संपणार

निवडणूक नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबवावा लागतो. त्यामुळे गुरुवारी रात्री १२.०० वाजता उघड प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. परिणामी प्रचारासाठी फारसा वेळ शिल्लक राहिला नसल्याने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT