मुंबई

लवकरच बदलापूर शहर वाहतूक कोंडीमुक्त

CD

बदलापूर शहर वाहतूक लवकरच कोंडीमुक्त
वनवे, ‘नो एंट्री’ रस्त्यांची अंमलबजावणी; १५ दिवसांत प्रायोगिक अंमलबजावणी
बदलापूर, ता. ४ (बातमीदार)ः कुळगाव-बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सिग्नल यंत्रणेनंतर आता शहरातील काही प्रमुख रस्ते वनवे तर काही रस्ते ‘नो एंट्री’ करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता. ३०) अंबरनाथ ट्राफिक युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांबळे, बदलापूर ट्राफिक युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गवळी, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी टेंभेकर, तांत्रिक सल्लागार मंगेश हिंदुराव, ट्राफिक अंमलदार राणे व कारोटे यांच्यासह डॉ. मिलिंद धारवाडकर यांनी बदलापूर पूर्व व पश्चिम भागातील प्रस्तावित वनवे व ‘नो एंट्री’ रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. त्यानंतर नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांची भेट घेऊन या नव्या वाहतूक आराखड्याबाबत माहिती देण्यात आली. त्यास त्यांनी सकारात्मक मान्यता दिली. येत्या १५ दिवसांत ही व्यवस्था प्रायोगिक स्वरूपात राबवली जाणार असून, शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे डॉ. धारवाडकर यांनी सांगत नागरिकांनी या नव्या वाहतूक व्यवस्थेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
या उपाययोजनेसाठी भाजपचे कोकण विभाग आयटी सेलचे संयोजक डॉ. मिलिंद धारवाडकर यांनी गेल्या चार ते पाच वर्षांपासून मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, पोलिस आयुक्त व वाहतूक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतूनच काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली असून, आता वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी पुढील टप्प्यातील उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT