उरण, ता. ४ (वार्ताहर) : तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मनसेने महाविकास आघाडीला नेहमी नि:स्वार्थीपणे सहकार्य केले, मात्र मविआतील घटक पक्षांनी मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नेहमी दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत राहून पक्षाला न्याय मिळत नसल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेमध्ये यापुढे मनसेचे महाविकास आघाडीला सहकार्य करणार नाही. मंगळवार (ता. ३) पासून मनसे महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केली.
उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मनसेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्याबदल्यात महाविकास आघाडी मनसेला एक पंचायत समितीची जागा देणार होती, मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, शेकाप या तीन पक्षांनीच जागावाटप करून मनसेला जागा दिली नाही; तरीही मनसे नेते व कार्यकर्त्यांनी कोणतीही तक्रार न करता महाविकास आघाडीला आपला पाठिंबा चालूच ठेवला. प्रचार यंत्रणेतही मनसे कार्यकर्त्यांना स्थान न देता महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनसेचा झेंडा आणि राज ठाकरे यांचे फोटो फक्त प्रचारात ठेवले. मनसे कार्यकर्त्यांना सतत मिळणारी मानहानीची वागणूक बघून मंगळवारी सायंकाळी कोप्रोली येथे मनसे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी मनसे महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.