मुंबई

विरार-डहाणू चौपदरीकरणाला गती

CD

विरार-डहाणू चौपदरीकरणाला गती
४७ टक्के काम पूर्ण; लोकल क्षमतेत मोठी वाढ अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम रेल्वेवरील विरार-डहाणू रोड मार्गावरील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला चौपदरीकरण प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे ४७ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विरारपुढील उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वेचा ३,५७८ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारा प्रवासी भार लक्षात घेऊन विरार ते डहाणू रोडदरम्यान अतिरिक्त दोन रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहेत. या चौपदरीकरणामुळे लोकल गाड्यांची संख्या वाढविता येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीही स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व खासगी, शासकीय तसेच वनजमीन संपादित करण्यात आली आहे. पर्यावरण मंजुरी आणि वन विभागाच्या परवानग्यांसह सर्व वैधानिक मंजुरी आधीच मिळाल्याने आता कोणताही अडथळा न राहता सर्व विभागांमध्ये काम सुरू आहे. वन व खारफुटी क्षेत्रातही नियमांनुसार कामे सुरू असल्याचे ‘एमआरव्हीसी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रकल्पाचे काम जोरात
प्रकल्पांतर्गत माती भरणी, पूल उभारणी, रस्ता अंडरब्रिज, स्थानकांचे नूतनीकरण तसेच विविध उपयुक्त इमारतींची कामे एकाच वेळी सुरू आहेत. आतापर्यंत ८८ टक्क्यांहून अधिक माती भरणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ५० पेक्षा अधिक पूल आणि रस्ता अंडरब्रिज उभारण्यात आले आहेत. या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे पूल क्रमांक ९२ आणि ९३ येथे पायाभरणी, खांब तसेच वरच्या संरचनेची कामे वेगाने सुरू असून, ही कामे निर्णायक टप्प्यात पोहोचली आहेत.

स्थानकांना नवा चेहरा
रेल्वे मार्ग चौपदरीकरणाअंतर्गत विरार, वैतरणा, सापळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वांगाव आणि डहाणू रोड या स्थानकांवर पुनर्विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नवीन स्थानक इमारती, फलाट, पादचारी पूल, सिग्नलिंग इमारती, कर्मचारी वसाहती तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहेत. काही ठिकाणी पूर्ण झालेल्या सुविधा रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून, त्या प्रत्यक्ष प्रवासी सेवेतही दाखल झाल्या आहेत.

विरारवर विशेष लक्ष
विरार स्थानकात मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना सुरू आहे. येथे फलाट क्रमांक ‘३ ए’चे रुंदीकरण करण्यात येत असून, उंच डेक्सची उभारणीही सुरू आहे. भविष्यात चर्चगेट ते डहाणू रोडदरम्यान अधिक लोकल सेवा सुरू करता याव्यात, यासाठी स्थानकाची मांडणी नव्याने करण्यात येत आहे.


विरार ते डहाणू रोड चौपदरीकरणाचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. सध्या जवळपास अर्धे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विरारपुढील उपनगरीय रेल्वे क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. चालू लोकल सेवा सुरू ठेवत प्रकल्प पूर्ण करणे हे मोठे आव्हान ‘एमआरव्हीसी’समोर आहे. तरीही प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेऊन काम नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने राबवले जात आहे.
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी,  एमआरव्हीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT