मुंबई

महापौर, उपमहापौर पदाबाबत फडणवीस, शिंदे तोडगा काढणार

CD

महापौर, उपमहापौर पदांबाबत फडणवीस, शिंदे तोडगा काढणार!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापौर, उपमहापौर या पदांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार असून, स्थायी समिती आणि सुधार समिती अध्यक्षपदेही महत्त्वाची असल्याने त्याबाबत सामोपचाराने दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. भाजपला जास्त जागा मिळाल्यामुळे महापौर भाजपचा होणार, हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. दोन्ही गटांची एकत्र नोंदणी झाली. आता दोन्ही पक्षांमध्ये समित्यांच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. महापौर, उपमहापौर तसेच वैधानिक आणि विशेष समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे निर्णय घेणार आहेत. ते काय निर्णय घेणार, याकडे आता भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. येत्या ११ फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर या पदांसाठी निवडणूक होणार असून, येत्या शनिवारी (ता. ७) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाच्या छाननीनंतर पीठासीन अधिकाऱ्यांकडून महापौर पदाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर नवनियुक्त महापौरांकडून निवडून आलेल्या उपमहापौरांचे नाव जाहीर केले जाते. त्यानंतर समित्यांच्या निवडणुका होतील, असे माजी खासदार शेवाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

ऑफिसच्या कामांची सुट्टी! OpenAI ने लॉन्च केले GPT-5.4, आता तुमचा लॅपटॉप-कॉम्प्युटर चालवणार स्वतः AI

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यता

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

SCROLL FOR NEXT