मुंबई

तो मृत्यू ट्रक चालकाच्या चुकीमुळे!

CD

‘घोडबंदर’वरील मृत्यू खड्ड्यांमुळे नव्हे!
ठाणे महापालिकेचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ठाण्यातील घोडबंदर रोडवर झालेले अपघाती मृत्यू ट्रकचालकांच्या चुकीमुळे झाले होते; खड्डे आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे नव्हे, असा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने नुकताच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला. वाहनचालक बेदरकार आणि निष्काळजीने वाहन चालवत असल्यामुळे अपघात झाल्याचे ठाणे पालिकेचे म्हणणे आहे.
ठाणे पालिकेच्या शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापतींबाबतीत भरपाई निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या आधीच न्यायालयीन आदेशांचे पालन करण्यात सुरुवात केल्याचे म्हटले आहे. ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांचे मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन कार्यवाहीला प्रतिसाद म्हणून हे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचेही महापालिकेने नमूद केले आहे. २१ ऑक्टोबर २०२५ला ट्रकने मागून एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार मनोज ठाकूर गंभीर जखमी झाले. यात त्यांच्यामागे बसलेल्या स्वाती कदम यांचा मृत्यू झाला होता. २०१९मध्ये नोंदवलेल्या पाच मृत्यूंचा आणि घोडबंदर रस्त्यावरील अपघातांचा समावेश आहे. अशा अनेक प्रकरणांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती, असा दावाही प्रतिज्ञापत्रात केला आहे.
...
समितीने मागवला अहवाल
उच्च न्यायालयाच्या १३ ऑक्टोबर २०२५च्या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ला नुकसानभरपाई समिती स्थापन केली असून, महापालिका आयुक्त आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे सचिवांचा समावेश आहे. या समितीच्या पहिली बैठकीत या अपघातावर चर्चा करण्यात आली आणि भरपाईची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिस आणि विभागीय अहवाल मागवण्यात आल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT