मुंबई

...तर वाहतूक कोंडी टळली असती!

CD

...तर वाहतूक कोंडी टळली असती!

द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक रखडल्याने परिस्थिती चिघळली
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाट परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्‍ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्चून महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक उभारला जात आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर आज (ता. ४) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेली महाप्रचंड कोंडी टळू शकली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मिसिंग लिंकचे काम मार्च २०२५मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र वेगवेगळ्या नैसर्गिक आव्हानांमुळे हा प्रकल्प रखडला आहे. घाट विभागात सर्वाधिक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. भविष्यातील वाहतूक कोंडीवर मिसिंग लिंक हा ठोस पर्याय ठरू शकतो. त्यामुळे असे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे वाहतूकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने ये-जा करतात. यामध्ये हलक्या वाहनांबरोबरच अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने बहुतांश वेळी खंडाळा घाट परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीकडून खोपोली ते कुसगावदरम्यान सुमारे १३.५ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक मार्ग उभारला जात आहे. बोगदे आणि खोल दरीवरील केबल स्टे ब्रिजमुळे घाट परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

सध्या मिसिंग लिंकचे ९५ टक्क्यांहून अधिक काम झाले असले तरी ते मार्च २०२५मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर डिसेंबर २०२५पर्यंत मुदतवाढ दिली होती. पाऊस आणि वाऱ्यामुळे पावसाळ्यात केबल स्टे ब्रिजच्या कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे काम पूर्ण न झाल्याने नव्याने एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली. दरम्यान, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला असता तर गॅस टँकरच्या दुर्घटनेनंतर वाहनधारकांना मिसिंग लिंकचा पर्याय खुला राहिला असता. ते लोणावळा येथून थेट खोपोली फूडमाॅलपर्यंत येऊ शकले असते.
-----
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करावे. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल. त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
-----
मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने तो वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रकल्पाला विलंब होऊनही ठोस दंड आकारणी केली जात नसल्याने कंत्राटदार संथगतीने काम करतात. मिसिंग लिंकही त्याचेच उदाहरण आहे.
- ॲड. गाॅडफ्रे पिमेंटा, पायाभूत सुविधातज्ज्ञ
-----
महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. उलट सातत्याने अशा प्रकल्पांना मुदतवाढ द्यावी लागत असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. मिसिंग लिंक वेळेत सेवेत आला असता तर वाहनधारकांना खंडाळा घाटात पर्याय उपलब्ध झाला असता.
- अनिल गलगली, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT