मुंबई

राज्यातील ३ हजार ३२८ शाळा अंधारात

CD

राज्यातील तीन हजार ३२८ शाळा अंधारात
एक हजार १६४ शाळांमध्ये मुलींसाठीच्या स्वच्छतागृहाची वानवा
मुंबई, ता. ४ : राज्यातील सरकारी, अनुदानित, ‍‍‍विनाअनुदानितसोबतच स्वयंअर्थसहाय्यितच्या तब्बल तीन हजार ३२८ शाळांमध्ये ‍विजेची जोडणी नसल्याने त्या अंधारात असल्याची धक्कादायक माहिती यू-डायसच्या २०२५-२६च्या अहवालातून समोर आली. अंधारात असलेल्या शाळांमध्ये सरकारी शाळांची संख्या सर्वाधिक तीन हजार १०२ इतकी असून अनुदानितची १३१, ‍विनाअनुदानितच्या १९ आणि स्वयंअर्थसहाय्यितच्या ७६ शाळांमध्ये वीजजोडणी नसल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.

राज्यातील दोन हजार ५५ शाळांमध्ये मुलांसाठी तर एक हजार १६४ शाळांमध्ये मुलींसाठी कोणतेही स्वतंत्र असे स्वच्छतागृह नसून १९ शाळांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नसल्याने विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. आदिवासी जिल्ह्यांपैकी नंदूरबार जिल्‍ह्यातील ४५५ शाळा, गडचिरोलीतील ४३१ शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही. त्यासोबतच बीड ३८६, नांदेड २२९, परभणी २००, हिंगोली १७४, धुळे १६३, नाशिक १६३, छत्रपती संभाजीनगर १५७, लातूर १३६, जालना ११८, अमरावती ८८, अ‍हिल्यानगर ८०, सोलापूर ५७, धाराशिव ५५, पुणे ४६, सांगली ३८, बुलडाणा ३५, कोल्हापूर ३४, रायगड ३२, रत्नागिरी ३१, अकोला २४, चंद्रपूर २०, नागपूर १५, सातारा ९, यवतमाळ ४, भंडारा ३, सिंधुदुर्ग आणि वाशीममध्ये प्रत्येकी दोन तर गोंदियामध्ये एका शाळेत वीज उपलब्ध नाही.

--
पायाभूत सुविधांची वानवा
सुविधा सरकारी अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित एकूण
मुलांसाठी स्वच्छतागृह १,९४२ ८६ ५ २२ २,०५५
मुलींसाठी स्वच्छतागृह १,०४३ ६४ २० ३७ १,१६४
पिण्याचे पाणी १७ ० ० २ १९
खेळाचे मैदान ९,९९५ १,२०८ १९४ १,१६३ १२,५६०
संरक्षण‍ भिंत ८,६७४ ९४२ ७७ २८९ ९,९९१
हात धुण्याची सोय १,५८७ ४५८ ५६ ३२७ २,४२८
ग्रंथालय २,९४० ९२५ १५२ ८१७ ४,८४३
‍विजेची उपलब्धता ३,१०२ १३१ १९ ७६ ३,३२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT