मुंबई

तात्काळमध्ये रद्द झालेल्या तिकिटांचा रिफंड नाहीच!

CD

तत्काळमध्ये रद्द झालेल्या
तिकिटांचा रिफंड नाहीच! 

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : तत्काळ सेवेत आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास तेच तिकीट रेल्वे प्रशासन दुसऱ्या प्रवाशाला त्याच किमतीत विकून एका तिकिटाचे दुप्पट पैसे कमावते. भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट आरक्षण सेवेतील ‘नो रिफंड’ योजना ही मनमानी असल्याचा आरोप करणारी याचिका बुधवारी (ता. ४) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

रेल्वे प्रशासनाच्या तत्काळ तिकीट आरक्षणामध्ये सर्वसामान्य प्रवाशांची निव्वळ फसवणूक होत असल्याचा आरोप वकील सचिन तिवारी यांनी जनहित याचिकेतून केला होता. ती याचिका बुधवारी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तत्काळमध्ये आरक्षित तिकीट रद्द केले गेल्यास त्याचा परतावा प्रवाशांना मिळणार नाही.  
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रद्द केलेल्या आरक्षणामधून कोट्यवधींचा नफा होतो. रेल्वे प्रशासनाने २०२२ मध्ये तत्काळमधून रद्द केलेल्या आरक्षित तिकिटांतून ८८७ कोटी रुपये तर २०२३ मध्ये आकडा वाढून १,०४२ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT