एपीएमसी भाजीपाला बाजारावर परिणाम
वाशी, ता. ४ (बातमीदार) : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीचा थेट फटका पश्चिम महाराष्ट्रातून नवी मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला वाहतुकीला बसला असून, त्याचा परिणाम एपीएमसी भाजीपाला बाजारातील आवकवर झाला आहे. सामान्यतः एपीएमसी बाजारात दररोज ५५० ते ६५० भाजीपाला गाड्यांची आवक होत असते; मात्र एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीमुळे बुधवारी केवळ सुमारे ४०० गाड्यांचीच आवक झाली. अनेक भाजीपाला वाहतूक करणाऱ्या गाड्या तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने काही गाड्या वेळेत बाजारात पोहोचू शकल्या नाहीत, तर काहींची आवकच रद्द करावी लागली. आवक कमी झाल्यामुळे बाजारात काही प्रमाणात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी, काही भाज्यांच्या दरात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली आहे. घाऊक तसेच किरकोळ बाजारातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तथापि, सध्या वातावरणात असलेल्या थंडीमुळे आधीच काही भाज्यांची आवक चांगली आहे. असे असले तरी बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते दरांमध्ये मोठी उसळी न घेता ते अद्याप सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. आवक थोडी कमी झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आवक पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी माहिती एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.