मुंबई

क्रिकेटच्या वादातून तरुणाचा खून; दोघांना अटक

CD

क्रिकेटच्या वादातून तरुणाचा खून; दोघांना अटक
ठाणे : गावदेवी मैदानात क्रिकेटच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणात खारटन रोड येथील रोहित मोरे (२६) या तरुणाचा चाकूने वार करून खून झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेत अमित किर (२७) हा सफाई कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी रोहित पटनेशा (२४) आणि विष्णू चव्हाण (२४) या दोघांना अटक केली आहे. खारटन रोड परिसरातील गावदेवी मैदानात क्रिकेटच्या वादातून आरोपी पटनेशा व चव्हाण यांनी हरिश नावाच्या मुलाला मारहाण केली. ही बाब पाहून रोहित मोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यातून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढत हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान आरोपींनी रोहित मोरे व अमित किर यांच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, उपचारादरम्यान रोहित मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत दोघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, मालक व्ही. के. सिंग CID कार्यालयात हजर

T20 World Cup, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी कोणाला करणार मदत? काय आहे आत्तापर्यंतचा इतिहास, जाणून घ्या

Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

EPFO Update: PF धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! PF वर मिळणार FD पेक्षाही जास्त व्याज; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा

Baramati Tragic Accident : बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT