मुंबई

पालिका रुग्णालयांची स्वच्छता ठेकेदारांच्या हाती?

CD

पालिका रुग्णालयांची स्वच्छता ठेकेदारांच्या हाती?
वर्ग चारच्या पदभरतीत टाळाटाळ; हजारो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः महापालिका रुग्णालयांतील स्वच्छता सेवा खासगी ठेकेदारांकडे देण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने हालचाली वेगवान केल्याने ‘रुग्णालयांचे हळूहळू खासगीकरण’ होत असल्याचा आरोप होत आहे. पश्चिम विभाग आणि पूर्व विभागातील रुग्णालयांसाठी स्वतंत्र स्वच्छता निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक रुग्णालयाचा परिसर, स्वच्छतेचे दर, वापरण्यात येणारी सामग्री आणि यंत्रसामग्रीचा तपशील देण्यात आला आहे.
पालिकेतील वर्ग चार (शिपाई, सफाई कर्मचारी) पदे भरण्यास तयार नसल्याच्या तक्रारी कामगार संघटना करतात. दुसरीकडे, खासगी ठेकेदारांवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेत असल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. या निविदांनुसार ठेकेदारांकडून मोठ्या रुग्णालयांसाठी दोन आणि लहान रुग्णालयांसाठी एक स्वच्छता यंत्र देणे बंधनकारक आहे. ऑपरेशन थिएटर, आयसीयू यांसारख्या संवेदनशील विभागांसाठी ‘व्हॅक्युम गन’ वापरण्याची अट आहे. प्रत्येक शौचालयाबाहेर ‘शेवटची स्वच्छता कधी झाली’ याची नोंद असलेले कार्ड लावणे, प्रथमोपचार पेटी बसवणे आणि प्राण्यांपासून (कुत्रे, मांजरे), मधमाश्या, वटवाघळे, कबुतरे आदींपासून पालिका परिसर मुक्त ठेवण्याची जबाबदारीही ठेकेदारांवर आहे.
रुग्णालयांकडे आधीपासूनच लायझॉल, फिनॉल, फिनाईल यांसारखी स्वच्छता सामग्री नियोजित वेळापत्रकानुसार उपलब्ध असताना नव्या निविदांची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निविदेत ‘कर्मचाऱ्यांचा संप होणार नाही’ अशी अट घालण्यात आली आहे. पालिका कोणत्याही खटल्यात पक्षकार ठरल्यास त्याचा खर्च ठेकेदाराने उचलायचा आहे. यामुळे कामगार हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, रुग्णालय स्वच्छता ही केवळ कंत्राटी काम नसून रुग्णांच्या सुरक्षिततेशी निगडित मूलभूत सेवा आहे. त्यामुळे खासगीकरणाऐवजी सक्षम मनुष्यबळ भरती करून कडक देखरेख व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
......................................
खासगीकरणाला विरोध
‘मानसिकता बदलवत असून खासगीकरणाला आमचा विरोध आहे. येत्या १४ फेब्रुवारीला कामगारांची परिषद घेत असून या विरोधासाठी मैदानातील लढाई लढण्याची तयारी आहे.
- प्रदीप नारकर, सहाय्यक सरचिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

SCROLL FOR NEXT