मुंबई

डहाणूत २०२ वनपट्टे प्रमाणपत्रांचे वाटप

CD

डहाणूत २०२ वनपट्टे प्रमाणपत्रांचे वाटप
शेतकरी मोर्चानंतर प्रशासनाकडून हालचालींना वेग
कासा, ता.५ (बातमीदार) ः वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित वनपट्ट्यांच्या मागणीसाठी चारोटी-पालघर ६५ किलोमीटरचा मोर्चा शेतकऱ्यांनी काढला होता. या मोर्चानंतर शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून डहाणू येथे २०२ वनपट्टे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
डहाणू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार विनोद निकोले यांच्याहस्ते तालुका डहाणू अंतर्गत १८७ तर तालुका तलासरी अंतर्गत १५ अशा एकूण २०२ वनपट्टे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. वनपट्टे प्रमाणपत्रे मिळाल्यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे प्राप्त झाले असून, उपस्थित लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी, वनविभागाचे अधिकारी, प्रांत कार्यालयातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने वनपट्टेधारक शेतकरी उपस्थित होते. यावेळी आमदार विनोद निकोले यांनी शेतकरी, आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे हे कर्तव्य आहे. त्या संघर्षाचे फलित वनपट्टे प्रमाणपत्रांच्या रूपाने आले आहे.
---------------------------------------
हक्कांना बळ
आदिवासी व शेतकरी बांधवांनी वनहक्कांच्या मागणीसाठी चारोटी ते पालघर असा तब्बल ६५ किलोमीटरचा पायी मोर्चा गेल्या १९ जानेवारी रोजी काढण्यात आला होता. या मोर्चामधून प्रलंबित वनपट्ट्यांचा प्रश्न मांडण्यात आला. त्याची दखल प्रमाणपत्र वितरणातून स्पष्ट झाले. या उपक्रमामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कांना बळ मिळाल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT