४४६ अधिकृत रिक्षा स्टँड
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून यादी जाहीर; रिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या मागणीला यश
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या क्षेत्रांतर्गत असलेल्या अधिकृत रिक्षा स्टँडची आकडेवारी अखेर जाहीर केली आहे. कल्याण आरटीओ अंतर्गत एकूण ४४६ अधिकृत रिक्षा स्टँड असून, याबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली आहे. रिक्षा चालक-मालक असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
रिक्षा चालक-मालक असोसिएशन, कल्याण यांनी नवीन आणि अधिकृत स्टँडची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आरटीओ निरीक्षक, केडीएमसी अधिकारी, वाहतूक पोलीस आणि संघटना पदाधिकारी यांनी संयुक्त सर्वेक्षण केले. त्यानंतर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने अटी व शर्तींच्या अधीन राहून या स्टँड्सना मंजुरी दिली आहे.
रिक्षा स्टँड मंजूर करताना प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत. स्टँडमुळे किंवा रिक्षांच्या डबल पार्किंगमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये, तसेच आरटीओने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच मीटर किंवा शेअर भाडे आकारणी करावी. चालकाने बॅच, ओळखपत्र प्रदर्शित करणे आणि अधिकृत गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. भविष्यात वाहतुकीची अडचण निर्माण झाल्यास, स्टँड इतरत्र हलवण्याचे पूर्ण अधिकार संबंधित विभागाकडे राहतील, अशा परिवहन विभागाच्या कडक अटी घातल्या आहेत.
क्षेत्रनिहाय आकडेवारी
शहर/परिसर अधिकृत स्टँड संख्या
कल्याण पश्चिम १२८
बदलापूर ११०
कल्याण पूर्व ७२
उल्हासनगर ७४
अंबरनाथ ६२
एकूण ४४६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.