मुंबई

काँग्रेसकडून नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार

CD

काँग्रेस नगरसेविकांचा टिळक भवनात सत्कार
डोंबिवली, ता. ५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविकांचा मुंबईतील ‘टिळक भवन’ या प्रदेश काँग्रेस कार्यालयात नुकताच गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रभारी राजन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला. नवनिर्वाचित नगरसेविका कांचन योगेश कुळकर्णी आणि समीना सलीम शेख यांचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आगामी काळात महापालिकेत जनहिताचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याचे आवाहन नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना करण्यात आले.
सत्कार समारंभानंतर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व उपस्थितांच्या सहमतीने एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांवरील नेमणुकांचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देण्यात आले आहेत. या सोहळ्याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस ॲड. नवीन सिंग, सरचिटणीस ब्रिज दत्त, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, सचिन सुरेंद्र आढाव, वर्षा शिखरे, राजेश तिवारी, सलीम शेख, योगेश कुळकर्णी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT