मुंबई

पंचायत समिती निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे- कपिल पाटील

CD

निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे ः कपिल पाटील
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) ः ठाणे जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडली असली तरी कार्यकर्त्यांनी सतर्क राहून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सतर्क रहावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. लोनाड आणि पडघा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांशी पाटील यांनी बुधवारी (ता. ४) संवाद साधला.
युती होवो अथवा न होवो भाजप कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थांचे व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर करून जनतेच्या सेवेसाठी कामाला लागावे, असाही सल्ला पाटील यांनी यावेळी दिला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतची मुदत मंगळवारी (ता. १०) संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहणे गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. शासनाने ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी देखील पाटील यांनी यावेळी केली. यावेळी भाजपा मंडळाध्यक्ष श्रीकांत गायकर, दयानंद पाटील, दत्तात्रय पाटोळे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT