उल्हासनगरात लेवा पाटीदार समाजाचा मेळावा उत्साहात
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : सकल लेवा पाटीदार स्नेहसंमेलन उल्हासनगरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन, गुणवंतांचा गौरव, सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी उदाहरणे आणि आपुलकीच्या भेटीगाठींमुळे या संमेलनातून लेवा पाटीदार समाजाच्या ऐक्याचे प्रभावी दर्शन झाले.
या संमेलनाला आमदार अमोल जावळे, संघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, सोयो एनर्जीज लिमिटेडचे संचालक किशोर ढाके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे उपाध्यक्ष भास्कर पाटील यांनी प्रास्ताविक सादर करत संघाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाध्यक्ष वसंत नेहते यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी व सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला. या वेळी रत्नाकर चौधरी आणि यशस्वी उद्योजक सुजित झांबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उल्हासनगर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका इंदिरा पाटील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका इंदिरा तरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सर्व मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन करत एकत्र येणे, शिक्षण-उद्योगात पुढे जाणे आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले. या वेळी कांचन नेमाडे यांनी महिलांनी संघटित होऊन समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या संमेलनाला जवळपास बाराशे समाजबांधवांचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे नीलकंठ चौधरी, वसंत नेहते, दीपक नेमाडे, भास्कर पाटील, संजय चौधरी, उल्हास पाटील, भगवान इंगळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासद, सल्लागार, संघटक व समाज बांधवांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.