मुलाखत कौशल्याबाबत मार्गदर्शन शिबिर
विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई येथील विद्यावर्धिनी संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने रोजगार इच्छुक युवक-युवतींसाठी ‘रेझ्युमे लेखन व वैयक्तिक मुलाखत कौशल्य’ या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर वर्तक महाविद्यालयातील सी.आर. राजाणी सभागृहात पार पडले. या शिबिरामध्ये आयडियल मॅनेजमेंटचे संचालक विवेक सारडा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रभावी रेझ्युमे (वैयक्तिक माहिती) कसा तयार करावा, मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने स्वतःचे सादरीकरण कसे करावे, तसेच उमेदवारांकडून होणाऱ्या सामान्य चुका व त्या टाळण्यासाठीच्या उपायांवर सविस्तर माहिती दिली. सदर शिबिराला ४१७ रोजगार इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोजगार व प्लेसमेंटच्या दृष्टीने हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.