मुंबई

अंबरनाथमध्ये ''अजित दादां''ना सर्वपक्षीय श्रद्धांजली !

CD

अंबरनाथमध्ये अजित दादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
​अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) ः बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बुधवारी (ता. ४) अंबरनाथमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील रोटरी क्लब येथे या शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
​श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारमाळे, उपनगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, जयहिंद बँकेचे अध्यक्ष विलास देसाई, राष्ट्रवादीच्या नगरसेविका पूनम शेलार, शिवसेना नगरसेवक सुभाष साळुंके, कमलाकर सूर्यवंशी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम उगले, ॲड. निखिल वाळेकर आणि युवा नेते सुजीत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
​यावेळी बोलताना मान्यवरांनी अजित दादांच्या कार्याचा गौरव केला. दादांसारखा कर्मठ, कार्यकुशल आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता अचानक सोडून गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत नेत्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि जनसामान्यांशी असलेली नाळ हीच त्यांची खरी ओळख होती, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT