गावठाणातील इमारतींमध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर
कचरा व्यवस्थापनासाठी योग्य नियोजनाची नागरिकांची मागणी
नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील शिरवणे व जुईपाडा या गाव-गावठाण परिसरात अनेक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असल्याचे चित्र आहे. पालिकेची कचरा संकलन यंत्रणा प्रामुख्याने मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित असून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. याबाबत संतोष सुतार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
अनेक इमारतींमध्ये कचरा गोळा करण्यासाठी डबेच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कचरा एका ठिकाणी साठवून ठेवावा लागत आहे. त्यामुळे इमारतींच्या मध्यभागी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली असून साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
कारवाईची गरज
पालिकेने गावठाण परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून कचरा संकलनाचे योग्य नियोजन करावे. नियम मोडणाऱ्यांना नोटीस द्यावी, तर सुका-ओला कचरा वर्गीकरण करणाऱ्या प्रत्येक इमारतीला कचरा डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी ठाम मागणी संतोष सुतार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.