मुंबई

बांबूची १ लाख रोपे तयार करण्याचे पितांबरीचे मिशन - डॉ. रविंद्र प्रभुदेसाई

CD

बांबूची एक लाख रोपे तयार करण्याचे पितांबरीचे मिशन - डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
कोकण प्रकल्पांवर आधारित विशेष पुस्तकाचे केले प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : बांबू हे बहुउद्देशीय पीक आहे. कमीत कमी खर्चात येणारे ते पीक असून, बांबू लागवड केवळ कोकणाला नाही, तर संपूर्ण राज्याला आर्थिकदृष्ट्या आधार देऊ शकते. म्हणूनच पितांबरी कृषी विभागाच्या माध्यमातून बांबूची एक लाख रोपे तयार करण्याचे मिशन आम्ही हाती घेतले आहे, असे मत डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या ६३ व्या वाढदिवस सोहळ्याचे एम. एच. हायस्कूलमधील तृप्ती बँक्वेट येथे बुधवारी (ता. ४) आयोजन केले होते. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी भूषवले. या वेळी व्यसपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, उद्योजिका राजश्री यादवराव व पितांबरीचे व्हाइस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई उपस्थित होते. दरम्यान डॉ. रवींद्र प्रभुदेसाई लिखित पितांबरीच्या विविध कृषी प्रयोगांची माहिती देणारे ‘अणुस्कुरा ते साखळोली आपलं कोकण स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास’, दत्ता जोशी लिखित ‘एकश: सम्पत’, विवेक प्रकाशित ‘आधुनिक शेतीचे मॉडेल ’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पुढे प्रभुदेसाई यांनी आपल्या पुस्तक निर्मितीचा प्रवास सांगितला. प्रयोगशील शेती करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करून मिळवलेले यश अशी कोकण प्रवासाची कहाणी या पुस्तकात वाचायला मिळणार असल्याने हे पुस्तक अभ्यासपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संजय केळकर म्हणाले, आज मराठी भाषा आणि माणसे याबद्दल खूप बोलले जाते, पण उद्योग क्षेत्रात मराठी माणूस किती पुढे जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र प्रभुदेसाई आहेत. एक सज्जन माणूस उद्योग क्षेत्र पादाक्रांत करू शकतो, हे प्रभुदेसाई यांनी दाखवून दिले आहे. उद्योग क्षेत्रात मराठी माणसे कशी काम करतात, हे तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिकावे.
-------------------
उद्योगपती घडवायचे असतील, तर या पुस्तकातील प्रकल्प निर्माण करणाऱ्यांकडून शिकले पाहिजे. प्रभुदेसाई यांचे पुस्तक म्हणजे कोकणात किंवा कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ग्रंथ ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले, तर कोकण विकासाच्या दृष्टीने पितांबरीसारखी आस्थापने आणि रवींद्र प्रभुदेसाईंसारखे उद्योजक हे कृषी क्षेत्राचे आधारस्तंभ आहेत, असे मत राजश्री यादवराव यांनी या वेळी व्यक्त केले.
--------------------
दरम्यान, वाढदिवसानिमित्त समाजऋण म्हणून प्रभुदेसाईंच्या हस्ते १५ सामाजिक संस्थांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. पितांबरीच्या कोकणातील ४० हून अधिक सहकारी आणि कुटुंबीयांचा प्रभुदेसाईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच आशुतोष भालेराव लिखित पितांबरीच्या प्रवासाची कहाणी उलगडणाऱ्या विशेष गाण्याचे स्क्रीनिंग करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT