मुंबई

प्रशासकीय राजवटीचा अस्त

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबई महापालिकेवर भाजपच्या महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची गुरुवारी (ता. ५) निवड झाली. या दोन्ही पदांच्या निवडणुकीतून अचानक शिवसेनेने माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता महापालिकेतील प्रशासकीय राजवटीचा शेवट झाला असून लोकप्रतिनिधींच्या हाती पुन्हा सत्ता आली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांसह नागरी समस्या तत्काळ सुटण्यासाठी मदत होईल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १११ जागांपैकी भाजपने स्वबळावर ६५ जागा निवडून आणल्या, तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४२ जागा निवडून आल्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ भाजपने पूर्ण केल्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता येणार, हे निश्चित झाले होते; मात्र महापौरपदासाठी महिला सर्वसाधारण खुला हा आरक्षण गट पडल्यामुळे महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापौरपदासाठी भाजपकडे अनेक महिला नगरसेविकांचे पर्याय होते; मात्र वनमंत्री गणेश नाईक यांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नगरसेवक सूरज पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता पाटील यांची निवड केली. तर वाशी गावातून सलग चार वेळा निवडून गेलेल्या दशरथ भगत यांची उपमहापौरपदासाठी निवड केली.

सुजाता पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने सरोज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर दशरथ भगत यांच्याविरोधात आकाश मढवी यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. गुरुवारी (ता. ५) सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी दोन्ही युतीधर्म पाळत उमेदवारी अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सरोज पाटील आणि आकाश मढवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या दोघांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या महापौरपदी सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची निवड झाली. ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र इथापे यांनी सुजाता पाटील आणि दशरथ भगत यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.


पाणी, आरोग्य सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा पूर्ण करणार आहोत. सामान्य नागरिकांच्या प्रश्न आणि सूचना ऐकून घेत प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेले पाच वर्षांचा धांडोळा घेऊन काम करायचे आहे. प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेली कामांना वेग देणार आहोत. नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे.
- सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महापालिकेतर्फे नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा शेवटच्या घटकापर्यंत विनाअडथळा पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- दशरथ भगत, उपमहापौर, नवी मुंबई महापालिका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशामुळे आम्ही महापौर आणि उपमहापौरपदाचे अर्ज मागे घेतले. राज्यात शिवसेना आणि भाजप महायुतीचे सरकार आहे. राज्यात महायुतीचे महापौर बसले आहेत. हा युतीधर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत.
- मनोज हळदणकर, गटनेता, शिवसेना, नवी मुंबई

राज्यात शिवसेना आणि भाजप महायुतीचे सरकार आहे. राज्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचा कारभारही खेळीमेळीच्या वातावरणात करणार आहोत. निवडणूक संपल्यामुळे वैर संपले आहे. शिवसेनेला सोबत घेऊन नवी मुंबई महापालिकेचे कामकाज केले जाणार आहे.
- डॉ. संजीव नाईक, माजी खासदार, भाजप नेते, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Summer Body Heat: उन्हाळ्यात सतत तळपायांची जळजळ, छातीत आग जाणवते? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; लगेच जाणवेल फरक

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

SCROLL FOR NEXT