मुंबई

कंटेनर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू ;

CD

कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
अपघातामुळे एक तास मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : त्र्यंबकेश्वरला दुचाकीवरून निघालेल्या मुंबई, दहिसर येथील आकाश चंद्र पुजारी (२०) या दुचाकीस्वाराचा कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ब्रिजजवळ मृत्यू झाला. या अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने एक तास वाहतूक कोंडी झाली होती, तर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने वर्तवला आहे.
अपघाताची माहिती दक्ष नागरिक दत्त आठवले यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी कळवा वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. घटनास्थळी अपघातग्रस्त दुचाकीचालक कंटेनरच्या टायरखाली आल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती. तत्काळ दुचाकीचालकाला वाहतूक पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या अपघातामुळे ठाण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहन एक तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर मुंबई-नाशिक रोड वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

आकाश निघाला होता त्र्यंबकेश्वरला
दहिसर येथील मृत आकाश हा गुरुवारी (ता. ५) पहाटे ४ वाजता आपल्या मित्रांसोबत नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनाकरिता जाण्यासाठी दुचाकीवरून घरातून निघाला. ठाण्यातून पुढे जाताना मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ त्याचा अपघात झाला. या वेळी तो दुचाकीवरून एकटाच प्रवास करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan: शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख; कर्जमाफीचा निर्णय कधी?

Jalgaon Gold Market : सोने-चांदीच्या भावात मोठी पडझड! चांदी तब्बल २४ हजारांनी स्वस्त, जळगावच्या बाजारपेठेत खळबळ

Gorai Bus Depot Python : मुंबईकरांनो सांभाळून! गोराई बस डेपोत शिरले दोन महाकाय अजगर; पाहा रेस्क्यूचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Petrol Diesel Price Maharashtra : अमेरिका-इस्त्रायल, इराण युद्धाचा परिणाम; महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर घ्या जाणून

Maharashtra RTO Recruitment : सरकारी नोकरीची मोठी संधी ! राज्य परिवहन विभागात होणार तब्बल 'इतक्या' जागांवर मेगा भरती

SCROLL FOR NEXT