मुंबई

रायगड जिल्ह्यात २६९ शाळा पात्र

CD

रायगड जिल्ह्यात २६९ शाळा पात्र
४७३९ जागांसाठी ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ ः आर्थिकदृष्ट्या मागास व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के विनामूल्य प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी रायगड जिल्ह्यातील शाळा नोंदणीची प्रक्रिया ३१ जानेवारी रोजी पूर्ण झाली असून, यंदा जिल्ह्यातील २६९ पात्र शाळांमधील एकूण ४७३९ जागांसाठी ऑनलाइन सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे.
गेल्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या तुलनेत यंदा आरटीई अंतर्गत नोंदणीकृत शाळांची संख्या किंचित घटली असली, तरी उपलब्ध जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई तसेच राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित स्वरूपात चालविल्या जाणाऱ्या शाळांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षाच्या तुलनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, नवीन कागदपत्रांची भर घालण्यात आली आहे. ज्या बालकांच्या पालकांचा (एक किंवा दोन्ही) मृत्यू १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोविड-१९ मुळे झाला आहे, अशा बालकांना ‘वंचित गट’ या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रवर्गात अर्ज करण्यासाठी मृत्यू दाखल्यासोबत रुग्णालयाने दिलेले कोविड निदानाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच अनाथालयात वास्तव्यास असलेल्या बालकांसाठी संबंधित संस्थेची अधिकृत कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार असून, अनाथालयाबाहेर वास्तव्यास असलेल्या अनाथ बालकांसाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचे हमीपत्र सादर करणे आवश्यक ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे, अनाथ बालकांसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट यंदा शिथिल करण्यात आली असून, त्यामुळे अशा बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.

कोट
प्रवेशासाठी बालक आणि पालकांचे आधार कार्ड किंवा नोंदणी पावती आवश्यक आहे. आधार नसल्यास ९० दिवसांच्या आत ते सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता प्रवेश दिला जाईल. मुदतीत आधार न दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
- ललिता दहितुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी-रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT