मुंबई

खांदेश्वरमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

CD

खांदेश्वरमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन
क्रेडाई-बीएनएम रायगडचा ९वा उपक्रम; ७०हून अधिक बिल्डर्सचा सहभाग
नवी मुंबई, ता. ५ ः नवी मुंबई आणि रायगड परिसरातील घरांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी क्रेडाई-बीएनएम रायगडतर्फे खांदेश्वर येथे ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ९व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. घर खरेदीसाठी एकाच ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध करून देणे, हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.
या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ७०पेक्षा अधिक नामांकित बिल्डर्स सहभागी होणार असून, ३० हून अधिक निवासी गृहप्रकल्प ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. विविध बजेटमधील घरे, आधुनिक सुविधा, तसेच नव्या जीवनशैलीला अनुरूप प्रकल्पांची माहिती थेट ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे घरांची तुलना करून योग्य निर्णय घेणे ग्राहकांसाठी सुलभ होणार आहे.
हा एक्स्पो केवळ घरविक्रीपुरता मर्यादित नसून, पारदर्शकता व विश्वासार्हतेच्या आधारे खरेदीदारांना योग्य पर्याय उपलब्ध करून देणारा उपक्रम असल्याचे क्रेडाई-बीएनएम रायगडचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी उपस्थित राहणार असून, त्यामुळे या सोहळ्याला विशेष आकर्षण लाभणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT