मुंबई

अबू सालेमचा संरक्षण खर्च भरण्यास नकार

CD

अबू सालेमचा संरक्षण
खर्च भरण्यास नकार

न्यायालयाने पॅरोलची मागणी फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी कुख्यात गुंड अबू सालेमची पॅरोलची मागणी गुरुवारी (ता. ५) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पोलिस संरक्षणाचा खर्च उचलणे परवडणार नसल्याची माहिती सालेमच्या वतीने न्यायालयाला देण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.

मोठा भाऊ अबू हकीम अन्सारीचा नोव्हेंबर २०२५मध्ये मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि भावाच्या निधनानंतरच्या चाळिसाव्या विधीला उपस्थित राहण्यासाठी १४ दिवसांच्या पॅरोलची मागणी सालेमने याचिकेद्वारे केली होती. तुरुंग प्रशासनाकडे केलेला अर्ज फेटाळल्यानंतर सालेमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायालयाने सालेमच्या वकिलांना अखरेची संधी देताना पोलिस संरक्षणाचा खर्च उचलावा लागेल अन्यथा आम्ही याचिका फेटाळण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, पोलिस संरक्षणाचा खर्च फारच जास्त असल्याचे सांगून सालेमने त्यास नकार दिला. तसेच, आपण आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नाही. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात निव्वळ सशस्त्र अभिनेता संजय दत्तच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी होती. त्यात आपल्याला दोषी ठरवले आहे. याआधीही सालेमला दोन वेळा पॅरोल मंजूर केला होता आणि त्या वेळी पोलिस संरक्षणाचा खर्च आकारण्यात आला नव्हता, असेही सालेमच्या वतीने वकील फरहाना शाह यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. सालेम दोन दशकांहून अधिक काळ तुरुंगात असून, एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात महापौरांचा जनता दरबार; नागरिकांच्या प्रश्नांना थेट न्याय देण्याची ग्वाही

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

Badlapur Crime: तस्करीचे धागे नाशिकपर्यंत! स्त्रीबीजप्रकरणी अटक डॉक्टरला पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT