सोमवारी पालकमंत्र्यांचा जनता दरबार
पालघर, ता. ७ (बातमीदार) ः वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जनता दरबार होणार आहे. या वेळी नागरिकांना विविध समस्या थेट मांडता येणार आहेत.
नागरिकांनी आपल्या समस्याचे, प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. तसेच जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.