मुंबई

अर्धवट रस्त्यामुळे मृतदेहाची अवहेलना

CD

अर्धवट रस्त्यामुळे मृतदेहाची अवहेलना
जव्हार, ता. ७ (बातमीदार) ः आंबेपाडा येथील रहिवासी शैलेश वागदडा यांचा मंगळवारी (ता. ३) सायंकाळी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने चांभारशेत, तिलोंडा मुख्य रस्त्यावर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची विदारक स्थिती समोर आली आहे.
जव्हारपासून ४२ किलोमीटर अंतरावर तिलोंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे आंबेपाडा गाव आहे. या गावची लोकसंख्या १४० एवढी आहे. चांभारशेत येथील तिलोंडा मुख्य रस्त्यापासून आंबेपाड्यापर्यंत एक किलोमीटर ८०० मीटर लांबीचा नवीन रस्ता २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत माती-मुरूम व खडीकरण करून पूर्ण करण्यात आला आहे. यासाठी ४६ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. या रस्त्यावरून जीप, अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे; मात्र चांभारशेत ते आंबेपाडा हा रस्ता डांबरीकरणासाठी प्रस्तावित असतानाही प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेअभावी मृतदेह झोळीमध्ये टाकून पायी आंबेपाडा गावात नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आल्याने संतापाची भावना आहे.

Sunil Tatkare: तिन्ही पवारांचा एकत्रित फोटो बघून तटकरे काय म्हणाले? रोहित पवारांना जुन्या भूमिकांची करुन दिली आठवण

Rohit Sharma: इतिहास बदलण्याची वेळ आलीय! T20 वर्ल्ड कपपूर्वी 'हिटमॅन' टीम इंडियाबद्दल काय म्हणाला? वाचा

Mumbai Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन... मुंबईत तापमानात बदल, पुढील ३ दिवस कडाक्याचा इशारा; कारण काय?

BCCI Central Contracts : रोहित-कोहलीचं डिमोशन, A+ ऐवजी B ग्रेडमध्ये समावेश? ३० खेळाडूंच्या यादीत कुणाची नावं?

DK Shivakumar Latest News : डीके शिवकुमार मुख्यमंत्री कधी? सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT