मुंबई

पोलीसच नियमभंग करतायत?

CD

पोलिसच नियमभंग करतायंत?
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर राज्य राखीव पोलिस वाहन वाळूत; नगर परिषदेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह
श्रीवर्धन, ता. ७ (वार्ताहर) ः श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र, शनिवारी थेट राज्य राखीव पोलिस बलाचे चारचाकी वाहन किनाऱ्यावरील वाळूत दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर परिषदेने स्पष्टपणे वाळू व रेतीमध्ये कोणतीही वाहने नेण्यास मनाई केली असताना, पोलिस वाहनानेच नियमभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने आता श्रीवर्धन नगर परिषद यावर नेमकी काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान शनिवारी (ता. ७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीवर्धन तालुक्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलिस बलाचा गट तैनात करण्यात आला असला, तरी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास खेकडा स्पॉट किनाऱ्यावरील वाळूत राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १ (पुणे) यांचे वाहन आढळून आले. या वाहनातून काही व्यक्ती समुद्रस्नानासाठी जाताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सूचनाफलक धाब्यावर, कारवाई कुणावर?
मठाचा गवंड व खेकडा स्पॉट किनाऱ्यावरील रॅम्पवर नगर परिषदेने स्पष्ट सूचनाफलक लावले असून, “वाळू व रेतीमध्ये कोणतीही वाहने नेऊ नयेत. नियमभंग झाल्यास वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या घटनेत पोलिस वाहन थेट रॅम्पवरून वाळूत उतरले आणि सुमारे १० ते १५ मिनिटे किनाऱ्यावर उभे असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही पर्यटकांकडून बिनधास्तपणे किनाऱ्यावर वाहने चालवली जात असल्याच्या घटना घडल्या असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. “नियम सर्वांसाठी समान असावेत, मग ते पर्यटक असोत किंवा पोलीस,” अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात नगरपरिषद कारवाई करणार की केवळ ताकीद देऊन विषय मिटवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: तिन्ही पवारांचा एकत्रित फोटो बघून तटकरे काय म्हणाले? रोहित पवारांना जुन्या भूमिकांची करुन दिली आठवण

Rohit Sharma: इतिहास बदलण्याची वेळ आलीय! T20 वर्ल्ड कपपूर्वी 'हिटमॅन' टीम इंडियाबद्दल काय म्हणाला? वाचा

Mumbai Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन... मुंबईत तापमानात बदल, पुढील ३ दिवस कडाक्याचा इशारा; कारण काय?

BCCI Central Contracts : रोहित-कोहलीचं डिमोशन, A+ ऐवजी B ग्रेडमध्ये समावेश? ३० खेळाडूंच्या यादीत कुणाची नावं?

DK Shivakumar Latest News : डीके शिवकुमार मुख्यमंत्री कधी? सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले...

SCROLL FOR NEXT