लग्नसराई व व्हॅलेंटाईनमुळे फुल बाजार गजबजला
गुलाबाला वाढती मागणी; विक्रीदार आनंदात, खरेदीदारांच्या खिशाला चाप
ठाणे, ता. ८ (बातमीदार) : राज्यात लग्नसराईची धामधूम आहे, तर दुसरीकडे, तरुणाईसाठी व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी लागणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध रंगांची फुले. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर बाजारांप्रमाणे ठाण्यातील फुल बाजारातही मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. फुल बाजारांसाठी ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ठाणे स्थानक परिसर, जांभळी नाका तसेच मुख्य बाजारपेठ. येथील बाजार पेठा विविध रंगाच्या व प्रकाराच्या फुलांनी सजल्या असून, परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. मात्र, त्यांच्या वाढलेल्या किमती पाहता विक्रीदार आनंदात असले तरी खरेदीदारांच्या खिशाला चाप बसत आहे.
फेब्रुवारी हा तसा तरुणाईसाठी आपले प्रेम व्यक्त करण्याचा महिना. तसेच या महिन्यात लग्नसराईचे अनेक मुहूर्तही पाहण्यास मिळतात. या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात एक समान लागणारी गोष्ट म्हणजे फुलं. प्रेम व्यक्त करण्यासाठी लागणारे गुलाब, तर लग्नसराई लागतात विविध फुलांच्या रंगेबीरंगी माळा. या दोन्ही गोष्टींचा थेट परिणाम फुल बाजारातील खरेदी-विक्रीवर होतो. महत्त्वाचे म्हणजे वातावारणात होणारे बदल. त्यामुळे अचानक येणारा पाऊस व त्याचा परिणाम हा थेट पिकांवर पडतो. यंदा पावसाने काही प्रमाणात उपकार जरी केले असले तरी मागील काही दिवसांत मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी पाहता त्याचा परिणाम हा बाजारपेठांत येणाऱ्या वस्तूंवर झाला आहे. याचा फटका फुल बाजारालाही बसला असून, फुलांच्या किमतीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. फुलांच्या किमती वाढल्या असल्या तरी खरेदीदारांची संख्या काही कमी झालेली नाही, असे फुलविक्रेते यांनी सांगितले आहे.
---------------------
लग्नसराईमुळे लाल गुलाब ३० रुपयांना मिळत आहे, तर रंगीबेरंगी गुलाब ५० रुपयांना विकले जात आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून दर महाग आहेत. शनिवारी (ता. ७) सुमारे १५० गुलाब विकले. साखरपुडा, लग्नसमारंभ आणि व्हॅलेंटाईन सप्ताहामुळे फुलांना मोठी मागणी आहे.
- सोपान काळे, फुलविक्रेते
--------------------
बाजारातील फुलांचे दर
लाल गुलाब - ₹ ३० (एक)
रंगीबेरंगी गुलाब -₹ ५० (एक)
गुलाब पुष्पगुच्छ - ₹ २०० ते ₹ ५००
गुलाब गजरा - ₹ ८० रुपयांना १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.