मुंबई

मुरबाड तालुक्याचा डंका

CD

मुरबाड तालुक्याचा डंका
ठाणे जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी स्पर्धेत अव्वल स्थानी

मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दमदार सादरीकरण करत मुरबाड तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. समूह गायन व समूह नृत्य या दोन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये मुरबाड तालुक्याने प्रथम क्रमांक आपल्या नावे केला.
ठाणे जिल्हा परिषदेतर्फे नुकत्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये दमदार सादरीकरण, शिस्तबद्ध तयारी आणि कलात्मकता याच्या जोरावर मुरबाड तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेत मुरबाड तालुक्याच्या संघाने एकापाठोपाठ एक उत्कृष्ट सादरीकरण करत पारितोषिकांची लयलूट केली. देवगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक एकनाथ देसले यांनी सलग तीन वर्षे या स्पर्धेत पारितोषिक जिंकले.
मुरबाडने समूह गायन व समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. एकपात्री सादरीकरणामध्ये शिक्षक एकनाथ देसले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक गायन स्पर्धेत भालचंद्र भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सुनील पवार यांनी द्वितीय क्रमांक आपल्या नावे केला. मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मधुकर गोरड, विस्तार अधिकारी कणकोसे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

फोटो - 197

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Launches E-Pantry : ‘आयआरसीटीसी’ने देशभरातील २५ रेल्वेंमध्ये ‘ई-पँट्री’ सेवा करण्याचा घेतला निर्णय!

T20 World Cup SA vs CAN: दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय; कॅनडाच्या नवनीतने दिली कडवी टक्कर! गुणतालिकेत मोठा बदल

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

SCROLL FOR NEXT