शिवछत्रपतींच्या ४२२ किल्ल्यांचा कलात्मक इतिहास एका चित्रात
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, स्वराज्य संकल्पनेचा आणि देदीप्यमान नेतृत्वाचा अनोखा आविष्कार प्रो. डॉ. दिनेश गुप्ता यांनी आपल्या कलाकृतीतून साकारला आहे. महाराजांनी जिंकलेल्या तब्बल ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून त्यांनी शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय, आविष्कारक आणि ऐतिहासिक चित्र निर्माण केले असून, या कलाकृतीत इतिहास, कला आणि संशोधन यांचा प्रभावी संगम दिसून येतो.
या प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात गेल्या वर्षी झाली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ दर्जा प्रदान केला. या ऐतिहासिक घटनेने प्रेरित होऊन, महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्ररूपात साकारण्याचा संकल्प डॉ. गुप्ता यांनी केला.
हे संपूर्ण पोर्ट्रेट साकारण्यासाठी त्यांना सलग दोन दिवस लागले. मात्र, या निर्मितीतील सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे ४२२ही किल्ल्यांवर केलेले सखोल संशोधन, त्यांची अचूक नावे, ऐतिहासिक संदर्भ आणि त्या सर्वांना महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वात कलात्मकरीत्या गुंफण केली आहे.
चौकट
भावी पिढीसाठी प्रेरणा
या कलाकृतीचे खरे महत्त्व केवळ तिच्या कलात्मक सौंदर्यात नसून, ती भावी पिढीसाठी जिवंत इतिहास ठरते यात आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी अशा सर्जनशील उपक्रमांची नितांत गरज आहे. ४२२ किल्ल्यांची नावे एका चित्रात एकत्र आणून, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, प्रशासन कौशल्य आणि स्वराज्याची व्यापक दृष्टी एका नजरेत उलगडून दाखवण्याचे कार्य या कलाकृतीतून घडते. त्यामुळे ही कलाकृती इतिहास जपण्याबरोबरच राष्ट्रप्रेरणा देणारे प्रभावी माध्यम ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.