मुंबई

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

CD

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा
म. गांधी विद्यायालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

टोकावडे, ता. ८ (बातमीदार) : जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड या संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, धसई येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी (ता. ६) उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. दीर्घकाळ शाळेशी जोडलेल्या आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींसोबतचे अनुभव यामुळे हा क्षण सर्वांसाठीच भावुक ठरला.
समारंभात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, अनुभव आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता भाषणातून व्यक्त केली. शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते सुटताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग शिक्षक उमेश सोलसे यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी रक्षा मोरे व वैदही बोराडे या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संतोष सुरोशे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षांना सामोरे जाताना घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. अभ्यासात सातत्य, योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि शिस्त या गुणांचे महत्त्व विशद करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

फोटो - 207

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Launches E-Pantry : ‘आयआरसीटीसी’ने देशभरातील २५ रेल्वेंमध्ये ‘ई-पँट्री’ सेवा करण्याचा घेतला निर्णय!

T20 World Cup SA vs CAN: दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय; कॅनडाच्या नवनीतने दिली कडवी टक्कर! गुणतालिकेत मोठा बदल

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

SCROLL FOR NEXT