मुंबई

सरकारी नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

CD

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : महसूल विभागात लिपिक पदावर नोकरी लावून देतो, असे प्रलोभन दाखवून एका व्यक्तीने घणसोलीतील एका सुशिक्षित महिलेची दोन लाख १० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संदीप उत्तम महाले याने स्वत:ला मंत्रालयातील अधिकारी असल्याचे भासवून ही फसवणूक केली आहे. सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुजीत पाटील हा त्याच्या पत्नीसाठी नोकरीच्या शोधात होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याच्या एका नातेवाइकामार्फत त्याची ओळख पनवेलमधील आदई गावात राहणाऱ्या संदीप महाले याच्याशी झाली होती. त्या वेळी महाले याने मंत्रालयात महसूल विभागात कार्यरत असल्याचे खोटे सांगितले. तसेच सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये लिपिक पदाची जागा रिक्त असून, त्या जागेवर सुजीतच्या पत्नीला नोकरीला लावून देण्याचे आश्वासन दिले होते. विश्वास संपादन करण्यासाठी महाले याने सुजीतची पत्नी आणि चुलत भावाला कोकण भवन येथे भेटायला बोलावले. तिथे त्याने कागदपत्रांची पडताळणी करण्याचे नाटक केले आणि १० मिनिटे कार्यालयात जाऊन आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. डीडी काढण्याच्या नावाखाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने मंत्रालयातील साहेबांना देण्यासाठी म्हणून त्याने एकूण दोन लाख १० हजार रुपये उकळले. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही नोकरी मिळत नसल्याने पाटील कुटुंबीयांनी महालेच्या पाठीमागे पैशांसाठी तगादा लावला असता, त्याने टाळाटाळ केली. अखेर त्याच्या घरी जाऊन विचारणा केल्यानंतर त्याने दोन लाख ५० हजारांचा धनादेश दिला. मात्र, तो बँकेत न टाकण्याची विनंती केली. कालांतराने त्याने आपला मोबाईल बंद केला आणि राहते घर सोडून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुजीत पाटील याने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Launches E-Pantry : ‘आयआरसीटीसी’ने देशभरातील २५ रेल्वेंमध्ये ‘ई-पँट्री’ सेवा करण्याचा घेतला निर्णय!

T20 World Cup SA vs CAN: दक्षिण आफ्रिकेचा सफाईदार विजय; कॅनडाच्या नवनीतने दिली कडवी टक्कर! गुणतालिकेत मोठा बदल

Nationwide Workers Strike : देशभरातील तब्बल ३० कोटी कामगार जाणार संपावर! ; ६०० जिल्ह्यांमधील कामं ठप्प होण्याची चिन्हं

Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

Shendurwada News : शेंदूरवादा गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुसंडी

SCROLL FOR NEXT