मुंबई

वाढवण रोजगाराचे केंद्र

CD

वाढवण रोजगाराचे केंद्र
कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारकडून करार
पालघर, ता. ८ ः वाढवण परिघातील गावांमधील तरुण तसेच जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून पायाभूत सुविधा विकास, मानवी भांडवल निर्मितीचा एकात्मिक दृष्टिकोन भारताच्या बंदर-आधारित विकासाला बळकटी मिळाल्याचे मंत्री सोनोवाल म्हणाले.
वाढवण बंदरासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी बंदर संचालनासाठी आवश्यक असलेल्या सीमाशुल्क प्रक्रिया व कागदपत्र व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केलेल्या दुसऱ्या तुकडीमधील प्रशिक्षणार्थींना मंत्री सोनोवाल यांच्या हस्ते अभ्यासक्रम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. समुद्री क्षेत्रातील कौशल्य विकास बळकट करत द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआई) यांच्या सहकार्याने जीपी रेटिंग अभ्यासक्रमातील ११ विद्यार्थ्यांना संभाव्य नियुक्तिपत्रांचे वितरण या वेळी करण्यात आले. या प्रशिक्षणार्थीना बंदर व्यवस्थापनाकडून इंटर्नशिप अर्थात प्रशिक्षणार्थ नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पकालीन कौशल्य अभ्यासक्रम राबवणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.
--------------------------------
२८ अभ्यासक्रमांचा समावेश
वाढवण परिसरातील ४४ गावांमधील विद्यार्थ्यांना निशुल्क मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रम व संधीबाबत तत्काळ माहिती देण्यासाठी चॅटबॉट सुरू केला आहे. उपक्रमात प्रशिक्षणासाठी आतापर्यंत एकूण ४५,८७८ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. यात वाढवण परिघातील ४४ गावांमधून १४,३१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या १६२ तुकड्यांमध्ये ६,००० हून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेत आहेत, तर कौशल्य विकास कार्यक्रमात २८ अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
------------------------
३० विद्यार्थ्यांची तुकडी
- कौशल्य निर्मिती योजना, कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआई) यांना इरादापत्र (एलओए) प्रदान करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वाढवण परिसरातील विद्यार्थ्यांना जेएनपीए, शेवा येथील जीटीआईच्या नव्याने विकसित प्रशिक्षण केंद्रात निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक तुकडीत ३० विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
- या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बंदर व लॉजिस्टिक्स क्षेत्राशी निगडित उद्योगाभिमुख कौशल्यांचे सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. यामध्ये युवकांना कंटेनर टर्मिनल असोसिएट्स म्हणून घडविण्यासाठी आरोग्य, सुरक्षितता, सुरक्षा व पर्यावरण (एचएसएसइ), संचालन तसेच अभियांत्रिकी महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रशिक्षणाचा समावेश आहे.
---------------------------------
आमची दृष्टी केवळ जागतिक दर्जाचे बंदर उभारण्याची नसून स्थानिक युवकांना उद्योगाशी सुसंगत कौशल्ये प्रदान केली जाणार आहेत. वाढवण बंदराच्या विकास व कार्यप्रणालीत सक्रिय सहभाग, त्याचा लाभार्थी होण्यास सक्षम करणे हा आहे.
- गौरव दयाल, अध्यक्ष, जेएनपीए आणि सीएमडी, व्हीपीपीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: जिल्हा परिषद- पंचायत समित्यांचे निकाल आज, पुण्यातील रंगतदार राजकीय लढती

पोलिस भरतीसाठी बुधवारपासून ‘मैदानी’! सोलापूर जिल्ह्यातील १७४ जागांसाठी ८३३४ जणांनी केले अर्ज; मैदानावर सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ रेकॉर्डिंगही, वाचा...

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

खुशखबर! लाडक्या बहिणींना एकदम ४५०० रुपये अन्‌ शेतकऱ्यांना एकदम मिळणार ६००० रुपये; ‘या’ महिन्यात मिळणार शासनाकडून लाभ, वाचा...

Share Buyback : ‘बायबॅक’ची तरतूद कोणाला फायद्याची?

SCROLL FOR NEXT