एसएसटी महाविद्यालयाची झेप
‘उडान’ स्पर्धेत पोवाडा गायनात प्रथम, पथनाट्यात तृतीय क्रमांक
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा प्रभावी ठसा उमटवत एसएसटी कला व वाणिज्य महाविद्यालयाने ‘उडान’ या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. पोवाडा गायनात प्रथम क्रमांक, तर पथनाट्यात तृतीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक परंपरेची ताकद सिद्ध केली आहे. या दमदार कामगिरीच्या जोरावर एसएसटी महाविद्यालयाची पोवाडा टीम थेट ‘महा उडान’ या आंतर-झोन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभाग (डीएलएलई) तसेच साकेत ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उडान’ स्पर्धेत विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोवाडा गायनाने परीक्षक व प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सशक्त मांडणी, प्रभावी गायन आणि आशयपूर्ण सादरीकरणाच्या बळावर प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाने आपली ओळख निर्माण केली. त्याचबरोबर पथनाट्य स्पर्धेतही तृतीय क्रमांक मिळवला.
या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांना सदान जावरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.
अंतिम फेरी १७ फेब्रुवारीला
एसएसटी महाविद्यालयाची पोवाडा टीम ‘महा उडान’ या आंतर-झोन अंतिम फेरीत सहभागी होणार असून, ही अंतिम फेरी १७ फेब्रुवारीला मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. या फेरीत विद्यापीठाच्या विविध झोन्समधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या निवडक संघांनाच सहभागाची संधी मिळते.
फोटो - 299
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.