मुंबई

उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा

CD

उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा
ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

शहापूर, ता. ९ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना तातडीने उत्तम प्रतीचे उपचार मिळण्यासाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख विजय देशमुख यांनी केली आहे. त्यांनी आरोग्य उपसंचालकांसह तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले.
शहापूर शहर या तालुक्याच्या मुख्यालयालगत मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मध्य रेल्वेचा लोहमार्ग आणि विविध प्रमुख जिल्हा आणि राज्य मार्ग सततच्या दळणवळणाने गजबजलेले असतात. तेथे अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. तालुक्यातील वासिंद, आसनगाव, पुणधे, आटगाव, खर्डी येथील औद्योगिक क्षेत्रातदेखील अपघात घडत असतात. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचाराची गरज असते. शिवाय सर्पदंश व श्वानदंशाच्या रुग्णांसोबतच विविध आजारांच्या आणि साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येचा आलेखदेखील दिवसेंदिवस वाढतच राहिला आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी अतिदक्षता विभागाची तातडीची गरज निर्माण झाली असल्याचे देशमुख म्हणाले.
उपजिल्हा रुग्णालयात उच्चश्रेणीचे वैद्यकीय अधिकारी आणि फिजिशियन उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. त्यासाठी कल्याण, ठाणे, भिवंडी व नाशिकमधील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. या परिस्थितीत दारिद्र्य रेषेखालील आणि आदिवासी रुग्णांची मात्र गैरसोय होत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सुसज्ज २०० खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करून तज्ज्ञ डॉक्टर, मुबलक परिचारक, कर्मचारी, आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत, अशी मागणी विजय देशमुख यांनी केली आहे. निवेदन तहसीलदारांना देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका सचिव रवींद्र लकडे, समन्वयक गणेश अवसरे, शिवाजी देशमुख, अतुल भालके, सुनील घोडविंदे, हर्षद राऊत, प्रमोद गायकर, प्रवीण ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो - 309

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT