स्थापनादिनी लोकोपयोगी उपक्रम करा
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेचा २८ फेब्रुवारीला २५वा स्थापना दिन आहे. यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे; मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले असल्याने या दिवशी लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आसिफ शेख यांनी केली आहे.
अजितदादा पवार यांचा विमान अपघातात २८ जानेवारीला मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यातील सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये शोकाकुल वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेचा २८ फेब्रुवारीला होणारा स्थापनादिनाचा कार्यक्रम रद्द करावा. तसेच या दिवशी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, अनाथ व वृद्धाश्रम, रुग्णालयातील गरीब रुग्णांना मोफत फळेवाटप करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.